परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।।
ह्या सूत्रात समर्थांनी दोन संदेश दिले आहेत.
एक चळवळ व दुसरे भगवंताचे अधिष्ठान .
थम आपण भगवंतांचे अि धष्ठान म्हणजे काय हे पाहू.
भगवंताच्या अधिष्ठानाचा विचार करता, समर्थांच्या तत्त्वज्ञानाचा मागोवा घेणे आवश्यक आहे.
श्री समर्थ अद्वैतवादी होते. त्यांच्या मते, मूळ परमात्म्याची दोन रूपे आहेत. एक निर्गुण दुसरे सगुण.
निर्गुण रूप सद्रुप आहे ते आहे एवढेच आपण सांगू शकतो. सगुण रूप हे सर्व शक्तीचे, सर्व मूल्यांचे व सर्व सद्गुणांचे मूलधार आहे.
म्हणून ते अनादि, अनंत सर्वशक्तिमान, सर्वगुण संपन्न व संपूर्ण आहे. साधुसंतांना त्याचा ‘सत्चिदानंदा’च्या रूपाने अनुभव येतो.
म्हणून भगवंताचे रूप ‘सत्चिदानंद’ आहे असे म्हणतात. ह्याच सत्चिदानंदाची उपासना करण्याकरता ज्ञान,
भक्ती आणि कर्म ह्यांची सांगड घालावी असे श्रीसमर्थ म्हणतात. ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्यांच्या सामर्थ्याचा आविष्कार म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान.
त्याकरता भगवंताची आराधना आवश्यक आहे.