नांदी म्हणजे सुरुवात . नाट्य मंदिरात जेव्हा नाट्य प्रयोग सुरू होतात तेव्हा घंटा वाजते व गणेश स्मरण करून नाटकाला सुरुवात होते . याला नांदी वाजणे म्हणतात. ऋणानुबंध संस्थेची नांदी सुद्धा गणपती मंदिरात च वाजली होती .सन २०११ मध्ये वारजे माळवाडीतील गणपती मंदिरात कलशारोहण सोहळ्याची तयारी सुरू होती. मदतीसाठी अनेक कार्यकर्ते पुढे येत होते, आणि बघता बघता १५-२० जणांची एक सशक्त टीम तयार झाली. सर्वांनी तन-मनाने मदत केली आणि पावशा गणपतीचा कलशारोहण सोहळा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडला.चांगली टीम तयार झाल्यामुळे मंदिरात नवीन-नवीन उत्सव सुरू करण्याचे विचार मनात आले. दोन महिन्यांनी चैत्र महिना आला, आणि मंदिरात वसंत उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला. उत्सवासाठी आमच्या टीमने छोट्याशा वर्गणीतून मदत केली आणि ती मंदिराला दिली. वसंतोत्सव अतिशय सुंदर रीतीने पार पडला आणि आमची टीम अधिक बळकट व कार्यान्वित झाली.वसंतोत्सवाचे दुसरे वर्ष आले. ह्यावेळी आम्ही कार्यकर्त्यांनी प्रत्येकी १००० रुपये जमा केले, ज्यामुळे साधारण १६ हजार रुपयांची वर्गणी जमा झाली. परंतु, ह्या वेळेस वसंतोत्सवाचा सर्व खर्च मंदिराने उचलला, त्यामुळे आमची वर्गणी माझ्याकडेच राहिली. रामनवमीचा उत्सव झाला, आणि त्या निमित्ताने आमच्या मित्र-परिवारातील एक जण माझ्याकडे आले आणि पैशांची थोडी गरज असल्याचे सांगितले. मी त्यांना सांगितले, “हो, करू मदत!” एक कार्यकर्त्याला विचारले, त्यांनी सांगितले, “देऊन टाका ५००० रुपये.” त्यामुळे मी त्या गृहस्थांना ५००० रुपये दिले.दोन-तीन महिन्यांनी त्यांनी ५००० रुपये परत आणून दिले. हीच घटना आमच्यासाठी एक प्रेरणा ठरली आणि ह्याच घटनेतून ऋणानुबंध संस्थेची स्थापना करण्याची नांदी झाली.
Related Post
पालकत्व: एक सुंदर प्रवास
पालकत्व पालकत्व हा आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय अनुभव आहे. हे एक अद्वितीय आणि आव्हानात्मक काम आहे ज्यामध्ये बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आणि सामाजिक विकासासाठी पालकांनी एक महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. पालकत्व ही एक प्रक्रिया आहे आणि पालक असण्याची एक जबाबदारी आहे. यात मुलाचे संरक्षण, पोषण, आणि विकासासाठी मार्गदर्शन करणे समाविष्ट आहे. पालकत्वात मुलांच्या शारीरिक, […]
स्थापना
वर्गणीतून राहिलेले पैसे अजून काही जणांनी वापरले आणि परत केले. एके दिवशी मंदिरात एक पालक शालेय मदत मागण्यासाठी आले. त्यांना आम्ही आमच्या पैशातून थोडी मदत केली. याच घटनेतून आम्हाला संस्था स्थापन करण्याची कल्पना सुचली. सर्वांनी एकत्र बसून संस्थेच्या स्थापनेचा विचार केला. सभासद शुल्क १०० रुपये ठरवले आणि किमान ५० सभासद करायचे ठरवले. प्रसाद धारेश्र्वर यांना […]
दान उत्सव, म्हणजेच The Joy of Giving Week, हा भारतात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. हा उत्सव म्हणजे दान, मदत आणि एकमेकांशी आपुलकीने वागण्याचा एक महत्त्वाचा संदेश आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपली जबाबदारी लक्षात येऊन इतरांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी प्रेरणा मिळते. दान उत्सवाचे महत्त्व दानाची संस्कृती भारताच्या मुळातच आहे. […]