स्थापना

वर्गणीतून राहिलेले पैसे अजून काही जणांनी वापरले आणि परत केले. एके दिवशी मंदिरात एक पालक शालेय मदत मागण्यासाठी आले. त्यांना आम्ही आमच्या पैशातून थोडी मदत केली. याच घटनेतून आम्हाला संस्था स्थापन करण्याची कल्पना सुचली.

सर्वांनी एकत्र बसून संस्थेच्या स्थापनेचा विचार केला. सभासद शुल्क १०० रुपये ठरवले आणि किमान ५० सभासद करायचे ठरवले. प्रसाद धारेश्र्वर यांना ही कल्पना सांगितली. त्यांनी तत्काळ १०१ रुपये काढून दिले आणि म्हणाले, “ही माझी सभासद वर्गणी!” हेच आमचे पाहिले सभासद ठरले पुढे ते कार्यकारी मंडळावर आले व संस्था पुढे नेण्यास त्यांनी खूप सहकार्य केले.पहिल्या दिवसा पासून आम्ही सभासद जमा करायला सुरुवात केली. ५० सभासद जमा होऊन ५००० रुपये जमा झाले. ५० सभासादांपैकी ९ जणांचे कार्यकारी मंडळ तयार झाले. हरिदास खेसे , दत्तात्रय पठारे, गिरीश जोशी, संजय मोरे, प्रसाद धरेश्वर, भरत पाटील, प्रसाद जानवेकर, सौ रंजनाताई बोरकर ,इंदुबाई शिवले यांचे कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले. आमच्यात त्यावेळी जास्त शिकलेले हरिदास खेसे हे होते म्हणून आम्ही त्यांना अध्यक्ष पद दिले. पुढे संस्थेचे नाव ठरवण्याची वेळ आली. ‘कर्तव्य’ आणि ‘ऋणानुबंध’ अशी दोन नावे पुढे आली होती. कोणते नाव ठेवायचे याचा निर्णय होईना कारण दोन्ही नावे आवडली होती. शेवटी मोरयाला शरण गेलो. मोरयाच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या आणि मोरयाने ‘ऋणानुबंध‘ चे नाव निश्चित केले. वकिलांना भेटून संस्था स्थापनेची कल्पना दिली. त्यांनी १५ दिवसात सर्व कागदपत्रे तयार केली आणि ३ जुलै २०१२ रोजी कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली. अशा प्रकारे, ‘ऋणानुबंध’ सामाजिक संस्था अस्तित्वात आली. हे सर्व मोरयाच्या समोर आणि त्याच्या आशीर्वादाने झाले.


Related Post

सामाजिक कार्याची क्षेत्रे

सामाजिक कार्याची क्षेत्रे : सामाजिक कार्य अनेक क्षेत्रांमध्ये करता येते ; त्यातील काही प्रमुख क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत शिक्षण: शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्था चालवणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करणे इ. आरोग्य: आरोग्य सेवा पुरवणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, मोफत औषधे वाटणे, रुग्णालये आणि दवाखाने चालवणे इ. स्त्री सक्षमीकरण: महिलांना शिक्षण, रोजगाराच्या […]

ऋणानुबंध संस्थेचा पहिला उपक्रम: पाणी वाटप

ऋणानुबंध संस्थेची स्थापना आणि पहिला उपक्रम: पाणी वाटप ३जुलै २०१२ मध्ये स्थापन झालेली ‘ऋणानुबंध’ संस्था, तिच्या सुरुवातीच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करत होती. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्हाला ३ सप्टेंबर २०१२ उजाडले. हा दिवस संकष्टी चतुर्थीचा होता आणि त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता ; तरीसुद्धा या पावसात आम्ही संस्थेचे नोंदणी पत्र आणले आणि ते […]

एकेरी पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज

समाजाच्या भविष्याचा आधार ऋणानुबंध संस्थेने शिक्षण क्षेत्रात मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला. सन २०१३ ते २०१५ ह्या काळात १८ विद्यार्थ्यांना एकूण रुपये ८३१३० रु मदत केली परंतु, काही वेळानंतर असे जाणवले की अनेक जण फक्त मदत मिळते म्हणून येतात, ज्यात गरजू आणि गरीब विद्यार्थी कमी आणि मदत मिळवण्याची इच्छा असलेले जास्त आहेत. […]