ऋणानुबंध संस्थेचा पहिला उपक्रम: पाणी वाटप

ऋणानुबंध संस्थेची स्थापना आणि पहिला उपक्रम: पाणी वाटप

३जुलै २०१२ मध्ये स्थापन झालेली ‘ऋणानुबंध’ संस्था, तिच्या सुरुवातीच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करत होती. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्हाला ३ सप्टेंबर २०१२ उजाडले. हा दिवस संकष्टी चतुर्थीचा होता आणि त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता ; तरीसुद्धा या पावसात आम्ही संस्थेचे नोंदणी पत्र आणले आणि ते पावशा गणपतीच्या चरणाशी ठेवले. यानंतर संस्थेची कागदपत्रे तयार करणे, लेटरहेड छापणे, शिक्के तयार करणे यासारख्या कामांची सुरुवात झाली.

सुरुवातीला देणग्या मिळवणे फार कठीण होते आणि त्यामुळे सर्व खर्च सभासद वर्गणीतून चालू होता. १५ दिवसांनी गणेशोत्सव सुरू झाला. विसर्जनाच्या दिवशी मला जाणवले की, एखादा उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. विचार करत असताना लक्षात आले की NDA रोडवर गणेश विसर्जन मिरवणूक जाते. साधारणत: १/२ किलोमीटरच्या अंतरावर गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक कार्यकर्ते आनंदाने नाचत असतात, त्यांना पाण्याची गरज असते. परंतु, रस्त्यात कोठेही पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती आणि कोणी ते करतही नव्हते.

त्यावेळी, आम्ही पाणी वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. ह्यासाठी पावशा गणपती देवस्थानचे विश्वस्त दिनकर दांगट यांनी खूप सहकार्य केले. त्यांनी पाणी, ड्रम, जागा आणि चहापाण्याची मदत केली. त्यांच्या सहकार्यातून आमचा पहिला पाणी वाटपाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात सर्व विश्वस्त आणि अनेक सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

‘ऋणानुबंध’ च्या या पहिल्या उपक्रमाने संस्थेची समाज सेवेतील ओळख मजबूत केली आणि भविष्यातील अनेक उपक्रमांसाठी प्रेरणा मिळाली.

Related Post

एकल पालकत्वाची कारणे/ reason of single parent children

एकल पालकत्वाची कारणे सर्व समाजा मध्ये एकल पालकत्व ही सामान्य बाब आहे. एकल पालकांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा त्याच्या मुलांवर विशिष्ट परिणाम होतो. ऋणानुबंध संस्थेसाठी, पुण्यातील गरीब लोकांच्या जीवनात सुधारणा घडवण्याच्या उद्देशाने, एकल पालकांना मदत करणे आणि त्यांचे जीवन सुलभ करणे हे महत्त्वाचे आहे. या ब्लॉगमध्ये आपण एकल पालकांचे विविध प्रकार आणि त्यांचे विश्लेषण […]

नांदी/ स्टार्ट ,सुरुवात

नांदी म्हणजे सुरुवात . नाट्य मंदिरात जेव्हा नाट्य प्रयोग सुरू होतात तेव्हा घंटा वाजते व गणेश स्मरण करून नाटकाला सुरुवात होते . याला नांदी वाजणे म्हणतात. ऋणानुबंध संस्थेची नांदी सुद्धा गणपती मंदिरात च वाजली होती .सन २०११ मध्ये वारजे माळवाडीतील गणपती मंदिरात कलशारोहण सोहळ्याची तयारी सुरू होती. मदतीसाठी अनेक कार्यकर्ते पुढे येत होते, आणि बघता […]

एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी RSO कडून सहाय्य

मागील लेखात आपण पाहिल की अनाथ विद्यार्थ्यांसारख्याच एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना सुद्धा आपल्या मदतीची, पाठिंब्याची गरज आहे .ह्या एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचे विविध मार्ग आहेत . Runanubandh Social Organization (RSO) यासाठी पुढील उपाययोजना करन्याचा प्रयत्न करीत आहे. शैक्षणिक सहाय्य RSO एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून […]