मागील वर्षी, ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या सर्वोदय प्रकल्पांतर्गत, विद्यार्थ्यांसाठी दिवा पेंटिंग या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनी फक्त कला शिकून घेतली नाही, तर व्यावसायिक दृष्टिकोनही आत्मसात केला.
शिवराज डोंगरे आणि उमेश जाधव या दोन विद्यार्थ्यानी या कार्यशाळेतून प्रेरणा घेत दिवाळी निम्मित अल्पकाळ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाजारातून पणत्या खरेदी केल्या त्याला पेंट केल्या आणि आर.एम.डी. कॉलेज जवळ स्टॉल टाकून त्या विक्रीसाठी ठेवल्या. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कौशल्यामुळे त्या सर्व पणत्या विकल्या गेल्या, ज्यातून त्यांना अंदाजे २,००० ते ३,००० रुपयांचा नफा झाला. विशेष म्हणजे, या नफ्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या शिक्षणासाठी केला.
या यशस्वी प्रवासातून विद्यार्थ्यांनी फक्त आर्थिक स्वावलंबन मिळवले नाही, तर स्वतःच्या मेहनतीचे महत्त्वही समजले. ऋणानुबंध सामाजिक संस्था अशा उपक्रमांद्वारे केवळ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत नाही, तर त्यांना त्यांच्या आयुष्यात स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करते. शिवराज आणि उमेश यांची कहाणी ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
ही यशोगाथा संस्थेच्या कार्याची दिशा आणि उद्दिष्ट स्पष्ट करते. भविष्यात अशाच अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी संस्था योगदान देत राहील.
