नांदी/ स्टार्ट ,सुरुवात

नांदी म्हणजे सुरुवात . नाट्य मंदिरात जेव्हा नाट्य प्रयोग सुरू होतात तेव्हा घंटा वाजते व गणेश स्मरण करून नाटकाला सुरुवात होते . याला नांदी वाजणे म्हणतात. ऋणानुबंध संस्थेची नांदी सुद्धा गणपती मंदिरात च वाजली होती .सन २०११ मध्ये वारजे माळवाडीतील गणपती मंदिरात कलशारोहण सोहळ्याची तयारी सुरू होती. मदतीसाठी अनेक कार्यकर्ते पुढे येत होते, आणि बघता बघता १५-२० जणांची एक सशक्त टीम तयार झाली. सर्वांनी तन-मनाने मदत केली आणि पावशा गणपतीचा कलशारोहण सोहळा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडला.चांगली टीम तयार झाल्यामुळे मंदिरात नवीन-नवीन उत्सव सुरू करण्याचे विचार मनात आले. दोन महिन्यांनी चैत्र महिना आला, आणि मंदिरात वसंत उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला. उत्सवासाठी आमच्या टीमने छोट्याशा वर्गणीतून मदत केली आणि ती मंदिराला दिली. वसंतोत्सव अतिशय सुंदर रीतीने पार पडला आणि आमची टीम अधिक बळकट व कार्यान्वित झाली.वसंतोत्सवाचे दुसरे वर्ष आले. ह्यावेळी आम्ही कार्यकर्त्यांनी प्रत्येकी १००० रुपये जमा केले, ज्यामुळे साधारण १६ हजार रुपयांची वर्गणी जमा झाली. परंतु, ह्या वेळेस वसंतोत्सवाचा सर्व खर्च मंदिराने उचलला, त्यामुळे आमची वर्गणी माझ्याकडेच राहिली. रामनवमीचा उत्सव झाला, आणि त्या निमित्ताने आमच्या मित्र-परिवारातील एक जण माझ्याकडे आले आणि पैशांची थोडी गरज असल्याचे सांगितले. मी त्यांना सांगितले, “हो, करू मदत!” एक कार्यकर्त्याला विचारले, त्यांनी सांगितले, “देऊन टाका ५००० रुपये.” त्यामुळे मी त्या गृहस्थांना ५००० रुपये दिले.दोन-तीन महिन्यांनी त्यांनी ५००० रुपये परत आणून दिले. हीच घटना आमच्यासाठी एक प्रेरणा ठरली आणि ह्याच घटनेतून ऋणानुबंध संस्थेची स्थापना करण्याची नांदी झाली.

Related Post

जागतिक कन्या दिन: मुलींना सन्मान आणि समान संधी देण्याचा संकल्प

काल, 22 सप्टेंबर 2024 रोजी, संपूर्ण जगभरात जागतिक कन्या दिन साजरा करण्यात आला. हा दिवस जगातील मुलींना सन्मान, समान हक्क आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जागतिक कन्या दिन आपल्याला मुलींच्या महत्वाकांक्षांना ओळखून, त्यांना योग्य संधी देण्याचा आणि त्यांच्या भविष्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्याचा संदेश देतो. भारतीय समाजात मुलींनी विविध क्षेत्रात […]

ऋणानुबंध/Runanubandh

ऋणानुबंध: एक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा घटक मराठी भाषेतला “ऋणानुबंध” हा शब्द अनेक अमराठी लोकांना समजायला कठीण वाटतो. गुगल देखील हा शब्द ओळखत नाही. परंतु, हीच आपल्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. “ऋणानुबंध” हा शब्द दोन शब्दांच्या संयोगातून बनलेला आहे: “ऋण” आणि “अनुबंध”. याचा अर्थ असा की, हे ऋणाचे (कर्जाचे) अनुबंध किंवा संबंध आहेत. विशेषतः, […]

एकेरी पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज

समाजाच्या भविष्याचा आधार ऋणानुबंध संस्थेने शिक्षण क्षेत्रात मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला. सन २०१३ ते २०१५ ह्या काळात १८ विद्यार्थ्यांना एकूण रुपये ८३१३० रु मदत केली परंतु, काही वेळानंतर असे जाणवले की अनेक जण फक्त मदत मिळते म्हणून येतात, ज्यात गरजू आणि गरीब विद्यार्थी कमी आणि मदत मिळवण्याची इच्छा असलेले जास्त आहेत. […]