एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी RSO कडून सहाय्य

मागील लेखात आपण पाहिल की अनाथ विद्यार्थ्यांसारख्याच एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना सुद्धा आपल्या मदतीची, पाठिंब्याची गरज आहे .ह्या एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचे विविध मार्ग आहेत . Runanubandh Social Organization (RSO) यासाठी पुढील उपाययोजना करन्याचा प्रयत्न करीत आहे.

शैक्षणिक सहाय्य

RSO एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देते :

  • शिष्यवृत्ती: आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी शिष्यवृत्ती देत आहे. परंतु निधी मर्यादित असल्याने आम्हाला अनेक विद्यार्थ्याना नाईलजास्तव नकार कळवावा लागतो.
  • अभ्यासक्रम मार्गदर्शन: विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासक्रमाची निवड आणि त्यासाठी मार्गदर्शन दिले जाते. या साठी वेगवेगळी सेशन आयोजित केली जातात.
  • अभ्यासिका आणि लाइब्रेरी ( library) सुविधा: विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत अभ्यासिका आणि पुस्तकांचे संग्रहालय उपलब्ध करून दिले आहे .अवांतर वचना साठी व अभ्यास क्रमिक पुस्तके , अपेक्षित , गाईड उपलब्ध आहेत .

मानसिक स्वास्थ्य सहाय्य

एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य सहाय्य आवश्यक असते :

  • समुपदेशन: विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाते .सवहाव वर्णन, वैशिष्टे, न्यूनता या समबंधी समुपदेशन करून त्यातील बदल सुचविले जातात
  • मनोविकारतज्ज्ञांचे सत्र: मानसिक ताण कमी करण्यासाठी मनोविकारतज्ज्ञांच्या सत्रांचे आयोजन करन्याचे नियोजन आहे .

आर्थिक सहाय्य

विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे:

  • फी माफी: गरजू विद्यार्थ्यांच्या शाळा किंवा कॉलेजच्या फी rso संस्था भरते किंवा थोडी फार तरी मदत करते .
  • शिक्षण साहित्य: पट्टी पेन्सिल पासून वर्षभर पुरेल असे पुस्तके, गणवेश, आणि अन्य शैक्षणिक साहित्य मोफत पुरवते .

कौशल्य विकास

विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे विकासासाठी पुढील उपक्रम राबवणे:

  • विविध कार्यशाळा : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कौशल्य कार्यशाळांचे आयोजन करत आहे .for example हस्ताक्षर सुधारणा , स्टडी स्किल
  • व्यावसायिक प्रशिक्षण: विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देणे या बाबत नियोजन चालू आहे

भविष्यातील योजना -पालकांसाठी सहाय्य

एकेरी पालकांसाठी सहाय्यकारी उपक्रम:

  • समुपदेशन आणि मार्गदर्शन: एकेरी पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात सहाय्य आणि मार्गदर्शन दिले जाते
  • आर्थिक सहाय्य: पालकांना आर्थिक मदतीचे स्रोत शोधून देणयाचा प्रयत्न चालू आहेत

सारांश

Runanubandh Social Organization (RSO) एकेरी पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. . शैक्षणिक, मानसिक, आर्थिक, आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आपण सर्व जण प्रोत्साहन देऊ शकतो. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उत्तम भविष्य घडवण्यासाठी मदत होईल आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल असे आम्हाला वाटते

Related Post

ऋणानुबंध संस्थेचा पहिला उपक्रम: पाणी वाटप

ऋणानुबंध संस्थेची स्थापना आणि पहिला उपक्रम: पाणी वाटप ३जुलै २०१२ मध्ये स्थापन झालेली ‘ऋणानुबंध’ संस्था, तिच्या सुरुवातीच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करत होती. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्हाला ३ सप्टेंबर २०१२ उजाडले. हा दिवस संकष्टी चतुर्थीचा होता आणि त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता ; तरीसुद्धा या पावसात आम्ही संस्थेचे नोंदणी पत्र आणले आणि ते […]

सर्वोदय

“सर्वोदय”

ऋणानुबंध संस्थेने एकल पालक विद्यार्थ्यांच्या प्रकल्पासाठी “सर्वोदय” हे नाव निवडण्यामागे काही प्रमुख कारणे अआहेत : या सर्व कारणांमुळे “सर्वोदय” हे नाव या प्रकल्पासाठी योग्य आणि प्रेरणादायक वाटते.

गुरुपौर्णिमा

आज गुरू पौर्णिमा आहे. याच विशेष दिवशी, १२ वर्षांपूर्वी, म्हणजेच ३ जुलै २०१२ रोजी, वारजे माळवाडी येथील पावशा गणपती मंदिरात ऋणानुबंध संस्थेची स्थापना करण्यात आली. या पवित्र स्थळी गणेशाच्या कृपेने आणि आशीर्वादाने आम्हाला संस्थेची संकल्पना सुचली. या दिवशी गुरुंच्या चरणी नतमस्तक होताना, आम्ही आमच्या संस्थेच्या प्रवासाचा आणि यशाचा विचार करतो. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही अनेक […]