दिवा पेंटिंग वर्कशॉपमधून स्वावलंबनाकडे प्रवास: शिवराज आणि उमेश यांची प्रेरणादायी कहाणी

मागील वर्षी, ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या सर्वोदय प्रकल्पांतर्गत, विद्यार्थ्यांसाठी दिवा पेंटिंग या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनी फक्त कला शिकून घेतली नाही, तर व्यावसायिक दृष्टिकोनही आत्मसात केला. शिवराज डोंगरे आणि उमेश जाधव या दोन विद्यार्थ्यानी या कार्यशाळेतून प्रेरणा घेत दिवाळी निम्मित अल्पकाळ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाजारातून पणत्या […]

दान उत्सव: एक छोटासा प्रयत्न, समाजाचा मोठा बदल

दान उत्सव, म्हणजेच The Joy of Giving Week, हा भारतात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. हा उत्सव म्हणजे दान, मदत आणि एकमेकांशी आपुलकीने वागण्याचा एक महत्त्वाचा संदेश आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपली जबाबदारी लक्षात येऊन इतरांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी प्रेरणा मिळते. दान उत्सवाचे महत्त्व दानाची संस्कृती भारताच्या मुळातच आहे. […]

जागतिक कन्या दिन: मुलींना सन्मान आणि समान संधी देण्याचा संकल्प

काल, 22 सप्टेंबर 2024 रोजी, संपूर्ण जगभरात जागतिक कन्या दिन साजरा करण्यात आला. हा दिवस जगातील मुलींना सन्मान, समान हक्क आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जागतिक कन्या दिन आपल्याला मुलींच्या महत्वाकांक्षांना ओळखून, त्यांना योग्य संधी देण्याचा आणि त्यांच्या भविष्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्याचा संदेश देतो. भारतीय समाजात मुलींनी विविध क्षेत्रात […]

गौरी पूजनाचा अनोखा उत्सव: ऋणानुबंध सामाजिक संस्थेची विद्यार्थ्यानीला शैक्षणिक मदत

आज पुण्यात सर्वत्र गौरी पूजनाचा आनंद साजरा केला जात असताना, ऋणानुबंध सामाजिक संस्था (RSO) ने या उत्सवाला एक वेगळा रंग दिला आहे. वारजे माळवाडी येथील सुवर्णा ××× या विद्यार्थिनीने शैक्षणिक मदतीसाठी आमच्याकडे संपर्क साधला होता. सामाजिक कार्यकर्त्या ताईंनी सुवर्णाच्या परिस्थितीची चौकशी केली असता, तिच्या कुटुंबाची कठीण परिस्थिती समोर आली. तिच्या वडिलांचे तीन-चार महिन्यांपूर्वी निधन झाले […]

श्री गणेशाचे आगमन: ऋणानुबंध सामाजिक संस्थेची गरजू विद्यार्थ्याला मदत

दिनांक 7 सप्टेंबर, सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सगळेजण मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची स्थापना करून पूजा-अर्चा करीत आहेत. या मंगल दिनी, ऋणानुबंध सामाजिक संस्थेने (RSO) आपला समाजसेवेचा धागा चालू ठेवला आहे. निखिल राजू उफाडे हा नवभारत हायस्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी आपल्या शैक्षणिक मदतीसाठी संस्थेकडे आला. कर्वेनगर येथील वडारवाडी परिसरात राहणाऱ्या या विद्यार्थ्याने बारावीच्या वर्गात प्रवेश घेतला […]

गोकुळाष्टमीच्या पवित्र दिवशी RSO NGO ने श्रीकृष्ण पारसे यांना शिक्षणासाठी दिली ५००० रु मदत

गोकुळाष्टमीच्या पवित्र दिवशी RSO NGO ने श्रीकृष्ण पारसे यांना शिक्षणासाठी दिली ५००० रु मदत शिवणे, पुणे – गोकुळाष्टमी, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा पवित्र दिवस, हा समाजसेवेसाठीही महत्त्वाचा ठरला. ऋणानुबंध सामाजिक संस्था (RSO) ने या पावन दिवशी आपल्या सामाजिक कार्याची परंपरा कायम राखत, एकेरी पालक असलेल्या श्रीकृष्ण पारसे या विद्यार्थ्याला ५००० रु ची मदत केली आहे. श्रीकृष्ण […]

RSO NGO ने कु. श्रध्दा यांना शिक्षणासाठी दिली ५००० रु मदत

वारजे माळवाडी, 25 ऑगस्ट 2024 – ऋणानुबंध सामाजिक संस्थेने (RSO) पुन्हा एकदा आपल्या सामाजिक जबाबदारीचे पालन करत एका गरजू विद्यार्थिनीला मदत केली आहे. कुमारी श्रध्दा , कर्वेनगर, पुणे येथील रहिवासी, आर्थिक संकटात असलेल्या आपल्या कुटुंबासाठी RSO कडे शिक्षणासाठी मदत मागितली होती. श्रध्दा हिच्या वडिलांना मोतिबिंदू झाल्यामुळे ते काम करू शकत नाहीत, आणि घरातील उत्पन्नाचे एकमेव […]

एकल पालकत्वाचे मुलांवर होणारे परिणाम आणि आव्हाने

एकल पालक असलेल्या घरात मुलांना अनेक समस्या आणि आव्हाने येऊ शकतात. त्यापैकी काही प्रमुख समस्या आणि आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत: शारीरिक आणि मानसिक परिणाम: शारीरिक आरोग्यावर परिणाम : अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, एकल पालकांच्या घरातील मुलांमध्ये शारीरिक आरोग्याच्या समस्यांचा धोका जास्त असतो. मुलांना कुपोषण, दुबळेपणा, आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका असतो. तसेच, एकल […]

पालकत्व: आई आणि वडीलांच्या भूमिका, कर्तव्ये आणि मर्यादा

पालकत्व: आई आणि वडील यांच्या भूमिका, कर्तव्ये आणि मर्यादा पालकत्व म्हणजे मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा पालनपोषणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा होय. यात आई आणि वडील दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ज्या प्रमाणे एखाद्या झाडाला पाणी व सूर्यप्रकाश आवश्यक असतो, अगदी त्या प्रमाणेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आई आणि वडील दोघांचीही गरज असते. आईचे स्त्रीत्व आणि वडिलांचे पुरुषत्व […]

गुरुपौर्णिमा

आज गुरू पौर्णिमा आहे. याच विशेष दिवशी, १२ वर्षांपूर्वी, म्हणजेच ३ जुलै २०१२ रोजी, वारजे माळवाडी येथील पावशा गणपती मंदिरात ऋणानुबंध संस्थेची स्थापना करण्यात आली. या पवित्र स्थळी गणेशाच्या कृपेने आणि आशीर्वादाने आम्हाला संस्थेची संकल्पना सुचली. या दिवशी गुरुंच्या चरणी नतमस्तक होताना, आम्ही आमच्या संस्थेच्या प्रवासाचा आणि यशाचा विचार करतो. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही अनेक […]